
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील साई सिटी परिसरात गावठी पिस्तूल बाळगून दहशत पसरवणाऱ्या २२ वर्षीय चेतन वसंत देऊळकर या तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी, २ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त केला. याप्रकरणी शनिवारी, ३ मे रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चेतन देऊळकर याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी पिस्तूल आढळले. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम