गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोलीत भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

बातमी शेअर करा...

गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोलीत भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

जळगाव: प्रतिनिधि

“गद्दार-खोके हा डाग जनतेने पुसला असून विरोधकांची बोलती बंद केली आहे,” अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेच्या भावना व्यक्त केल्या. शिरसोली येथे त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. “सत्ता टिकवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी आहे. मला गरीब जनतेच्या सेवेमुळे उर्जा मिळते, त्यामुळे मी दिवस-रात्र जनतेसाठी झटतो,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

शिरसोलीत बारी पंच मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई मातेची मूर्ती, नागवेल पानाचा कंडा, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, महिला व युवक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहात त्यांना सन्मानित केले.

 

युवासेना तालुका प्रमुख रामकृष्ण काटोले म्हणाले, “या विजयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विकास आणि शिंदे साहेबांनी दिलेल्या योजनांचा मोठा वाटा आहे.”

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, “शिरसोली हे हिंदुत्ववादी विचारांनी भारलेले गाव आहे, त्यामुळे इथला विकास आणि संस्कृती जोपासण्याचे काम अखंड सुरू राहील.”

हायस्कूलचे चेअरमन विलास बारी यांनी महिला बचत गटांसाठी उमेद भवन उभारण्याची मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्वरित या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरीचे संकेत दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य सुरेश अस्वार यांनी केले, तर गिरीश वराडे यांनी आभार मानले.

व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील, माजी जि.प. सदस्य पप्पू सोनवणे, धनुबाई आंबटकर, भाजप तालुका अध्यक्ष हर्षल चौधरी, सरपंच हिलाल भिल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

या भव्य सत्कार सोहळ्याला गावातील विविध समाज बांधव, महायुतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम