गिरणा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरून मृत्यू

बातमी शेअर करा...

गिरणा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरून मृत्यू

प्रतिनिधी | जळगाव

जळगाव तालुक्यातील लमांजन गावात मजुरीसाठी वास्तव्याला आलेल्या मध्यप्रदेशातील एका व्यक्तीचा गिरणा नदीत आंघोळीसाठी गेले असता पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्घटना मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी घडली असून, रात्रभर शोध घेतल्यानंतर बुधवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. मृताचे नाव जयसिंग सुभाष बारेला (वय ४०) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंग बारेला हा मध्यप्रदेशातील शिरवेल येथील मूळ रहिवासी असून कुटुंबासह लमांजन येथे मजुरीसाठी वास्तव्यास होता. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तो गिरणा नदीकाठी आंघोळीसाठी गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही.संध्याकाळपर्यंत तो न आल्याने त्यांची वृद्ध आई आणि बहिण शोध घेण्यासाठी नदीकाठी गेल्या. तेव्हा त्यांना किनाऱ्यावर जयसिंग यांचे कपडे आणि मोबाईल फोन दिसून आला. त्यामुळे तो नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त झाला.घाबरलेल्या आई व बहिणीने तातडीने ही माहिती लमांजन गावचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना कळवली. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम हाती घेतली, परंतु अंधारामुळे प्रयत्न निष्फळ ठरले.

बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता गिरणा नदीच्या पात्रात जयसिंग बारेला यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवला. या घटनेमुळे लमांजन गावात हळहळ व्यक्त होत असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम