गिरणा नदीत बुडालेल्या तरुणाचा चार दिवसानंतर सापडला मृतदेह

बातमी शेअर करा...

गिरणा नदीत बुडालेल्या तरुणाचा चार दिवसानंतर सापडला मृतदेह
जळगाव : गणेश विसर्जनासाठी गेलेला राहुल रतीलाल सोनार (वय ३४, रा. वाघ नगर) हा तरुण गिरणा नदीत बुडाला होता. चार दिवसानंतर बुधवारी सावखेडा शिवारातील पोदार शाळेच्या मागील बाजूस या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तर भोकणी शिवारात बुडालेल्या गणेश गंगाधर कोळी (वय २५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) याचा अद्यापही शोध लागलेला नसून त्याचा शोध सुरु आहे.

मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गिरणा पंपिंग परिसरात गेलेल्या राहूल सोनार तर दुसऱ्या घटनेत ममुराबाद येथील गणेश कोळी हा तरुण भोकणी
शिवारात गिरणा नदीपात्रामध्ये बुडाल्याची घटना शनिवारी घडली होती. घटनेनंतर तात्काळ त्या दोघांचा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकासह पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध घेतला जात होता.

चौथ्या दिवशीही शोध कार्य सुरु असतांना सावखेडा शिवारात पाण्यावर राहुल सोनारचा मृतदेह तरंगताना आढळला. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला आहे. राहूल सोनार या तरुणाचा सापडल्याच माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूला अविवाहीत असून त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व वहिनी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम