गिरणा नदीपात्रात महसूल विभागाकडून धडक कारवाई

बातमी शेअर करा...

गिरणा नदीपात्रात महसूल विभागाकडून धडक कारवाई
तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर जप्त
भडगाव प्रतिनिधी

गिरणा नदी पात्रातुन अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल व पोलीस प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून सतत कारवाई करत आहे. तरीही वाळु माफिया कडुन अवैध वाळू उपसा कमी होताना दिसत नाही. महसूल विभागाने सोमवारी पहाटे पाच वाजेच्यास सुमारास गिरणा पंपिंगजवळ कारवाई केली. या कारवाईत तीन जेसीबी व चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आली असून अनेक वाळूमाफिये वाहने घेवून पसार झाले. त्याच्यावर देखील महसूल विभागाच्या

पथकाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

भडगाव – पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीपात्रातुन वाळुचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. दि २४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास महसुली सहाय्यक महादु कोळी यांच्यासह गिरणा नदीपात्रात सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाठिकाणी गेले. त्याठिकाणी तीन जेसीबीमशिनच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातुन वाळु उत्खनन करुन ०४ ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरतांना दिसुन आले. पथक पोहचताच वाळूमाफिये जेसीबी आणि वाहने घेवून शहराकडे पळून गेले. त्यापैकी एका जेसीबीचे पथकाने फोटो काढले. वाळूमाफियांनी याठिकाणाहून सुमारे ५० ब्रास वाळू चोरुन नेली असून याप्रकरणी टोणगाव महसुली अधिकारी प्रशांत भिका कुंभारे यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक करीत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम