गिरणा नदीवरील बंधारे लवकर मार्गी लावण्यासाठी निवेदन ; वैशाली सूर्यवंशी यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट

बातमी शेअर करा...

गिरणा नदीवरील बंधारे लवकर मार्गी लावण्यासाठी निवेदन ; वैशाली सूर्यवंशी यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट

पाचोरा I पाण्याशिवाय शेती समृद्ध होऊ शकत नाही, या तत्त्वाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रीम प्रोजेक्ट, म्हणजेच गिरणा नदीवरील प्रस्तावित बंधारे लवकर मार्गी लावण्यासाठी भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी मुंबईला जाऊन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन सादर केले. यावेळी जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता व्ही. डी. पाटील उपस्थित होते.

चाळीसगाव-भडगाव-पाचोरा या गिरणा खोऱ्यातील शेतकरी आणि शेतीसाठी हे बंधारे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कामे तातडीने सुरू झाल्यास या परिसराला पाणी मिळून शेती समृद्ध होईल. वैशाली सूर्यवंशी यांनी प्रस्तावित बंधारे तसेच नारपार–गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे या भागाला अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली.

स्व. आर. ओ. पाटील यांनी आमदार असताना या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट आखणी करून गिरणा परिसर सुजलाम-सुफलाम व्हावा, असा दृष्टीकोन ठेवला होता. मात्र त्या वेळी विरोधी पक्षाची सत्ता असल्यामुळे प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही.

वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण पाचोरा-भडगाव तालुक्यात ग्रीन कॉरिडॉर तयार होईल, शेती व शेतकरी समृद्ध होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बलवती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम