
गिरणा प्रकल्पातून विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गिरणा प्रकल्पातून विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जळगाव : वाढत्या पाणलोट क्षेत्रातील आवक पाहता गिरणा प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. रविवार दि. १४ रोजी सायंकाळी सात वाजता प्रकल्पाचा विसर्ग ८१४ क्युसेक्सवरून थेट २४७६ क्युसेक्स (७०.७ क्युमेक्स) करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन चाळीसगाव पाटबंधारे विभागाने नागरिक व शेतकऱ्यांना केले आहे.
सध्या प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ व ६ हे प्रत्येकी ३० सेंमीने उघडे ठेवून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. पुढील काही तासांत प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात आणखी वाढ अथवा घट करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यातील वाघूर धरणही तब्बल ९५.५३ टक्के भरले असून जलसाठ्याच्या स्थितीमुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम