गिरणा प्रकल्पातून विसर्ग वाढला; दुपारी 4 वाजता 51996 क्युसेक्स झाला

बातमी शेअर करा...

गिरणा प्रकल्पातून विसर्ग वाढला; दुपारी 4 वाजता 51996 क्युसेक्स झाला

चाळीसगांव,: पाटबंधारे उपविभाग चाळीसगांव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या आवकीनुसार आज दुपारी 4 वाजता प्रकल्पाचा विसर्ग 44568 क्युसेक्स वरून वाढवून 51996 क्युसेक्स (1471.49 क्युमेक्स) करण्यात आला आहे. सध्या गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक 1, 2, 5 आणि 6 प्रत्येकी 180 सेमी तर क्रमांक 3 आणि 4 प्रत्येकी 150 सेमी आणि क्रमांक 7 ते 14 प्रत्येकी 30 सेमी ने उघडे आहेत.

गिरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने खालील भागातील शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. प्रकल्पात येणारी पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम