गीता म्हणजे जीवनाकडे यश अपयश यातून सावरण्याचा मंत्र – नयनप्रसाददास स्वामी
शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे गीता पठाण स्पर्धेचे आयोजन
गीता म्हणजे जीवनाकडे यश अपयश यातून सावरण्याचा मंत्र – नयनप्रसाददास स्वामी
शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे गीता पठाण स्पर्धेचे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी
जगण्याचे संदर्भ अधोरेखित करणारा दोन अक्षरी ग्रंथ म्हणजे गीता ..गीता म्हणजे जीवनाकडे यश अपयश यातून सावरण्याचा मंत्र आहे असे स्वामी नारायण मंदिराचे नयनप्रसाददास स्वामी यांनी सांगितले ते अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान आणि के.सी.ई.सोसायटीचा शालेय विभाग द्वारा आयोजित शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय आयोजित गीता पठण स्पर्धेच्या आयोजन प्रसंगी बोलत होते.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक विद्यालयातील सातशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेच्या समारोप प्रसंगी जेष्ठ पत्रकार हेमंत अलोने यांनी गीता शालेय जीवनात विद्यार्थ्याला व्यक्तिमत्व विकासाकरिता आणि संस्कार याचे सक्षम माध्यम आहे. यामुळे विद्यार्थ्याचे आचार,विचार व संस्कार प्रभावित होतात असे प्रतिपादन केले.
यावेळी मंचावर सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर,प्रा.अशोक राणे,प्राचार्य संजय भारंबे,मुख्याध्यापक प्रणिती झांबरे,कातळशिल्प संशोधक ए.के.मराठे,जेष्ठ समाजसेविका सुषमा प्रधान,स्वप्नील माळी उपस्थित होते. गीतेतील १८ व्या अध्यायातील शोल्कांचे पठण विद्यार्थ्यांनी केले. प्रतिनिधिक स्वरुपात शालेय विद्यार्थिनी पूर्वी धामणे ,पालक प्रतापसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक दलाल,महेंद्र नेमाडे,बिपीन झोपे,व्ही.एस.गर्जे,संदेश कराडकर,विवेक मोरे,डी.ए.पाटील,व सी.बी.कोळी यांनी परिश्रम घेतले. विजयी विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वप्नील माळी यांनी तर डी.डी.झोपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृतिचिन्ह बिपीन झोपे यांनी दिलीत.यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल शहरी विभाग गट पहिला प्रथम विधी पाटील,द्वितीय अनुश्री चौधरी,तृतीय कृतिका करोसिया, उत्तेजनार्थ ललित नारखेडे,काव्य भंगाळे,दर्शिका खराटे,ग्रामीण विभाग गट पहिला प्रथम गायत्री पाटील,द्वितीय हिमाली चौधरी,तृतीय शिवांश राउत, उत्तेजनार्थ वेदिका महाजन,यशवीर पाटील,रिद्धी पाटील, शहरी विभाग गट द्वितीय प्रथम यश चौधरी, द्वितीय हेमंत पाटील, तृतीय विधी किंनगे,उत्तेजनार्थ निधी भंगाळे,वैदेही गडदे,चिन्मय इंगळे,ग्रामीण विभाग गट द्वितीय प्रथम आराध्या पाटील,द्वितीय केतकी महाजन,तृतीय सिद्धी कोळे, उत्तेजनार्थ पूर्वा माळी,आरोही पाटील,प्रणव माळी , शहरी विभाग गट तिसरा प्रथम आर्या पाटील,द्वितीय भूमिका चौधरी,तृतीय हेमांगी सूर्यवंशी, उत्तेजनार्थ धनश्री पाटील,दिव्या सोनावणे,दिगम्बर पाटील,ग्रामीण विभाग गट तिसरा प्रथम पूर्वी धामणे,द्वितीय माधुरी तीकांडे,निशा पाटील, उत्तेजनार्थ मोहिनी पाटील ,योजना कोळे,खुश पवार,आणि शहरी विभाग गट सांघिक प्रथम सोहाली चौधरी,द्वितीय तृप्ती चौधरी,तृतीय प्रज्ञा वाणी, उत्तेजनार्थ प्रतीक्षा पवार,ग्रामीण विभाग गट सांघिक प्रथम राहूल यादव,द्वितीय हेतल कोळे,तृतीय अनुशका पवार, उत्तेजनार्थ कामिनी पाटील
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम