गुजरातमध्ये फरार असलेला सराईत गुन्हेगार अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा...

गुजरातमध्ये फरार असलेला सराईत गुन्हेगार अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात
अमळनेर (प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील गंभीर स्वरूपाच्या दहा ते बारा गुन्ह्यांत फरार असलेल्या पातोंडा येथील एका सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी अटक करून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मनोज शिवाजी पाटील (वय ३४, रा. पातोंडा) याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे गुजरात व बिलिमोरिया येथे दाखल आहेत. पोलिसांनी तांत्रिक माध्यमातून लोकेशन मिळवूनही तो उपलब्ध होत नव्हता. गुजरात पोलिसांच्या विनंतीनुसार निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पातोंड्यात कारवाई केली. एका स्थानिक व्यक्तीने घर दाखवल्यानंतर पोलिसांनी दबा धरला. पोलिस आल्याचे लक्षात येताच आरोपीने मागच्या बाजूने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम