गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक
सावदा पोलिसांची कारवाई
सावदा प्रतिनिधी
चिनावल शिवारातील चिनावलखेडा रस्त्यावरील सुखी नदीच्या पुलावर तीन जण प्रतिबंधित गुटखा व पानसुपारी ची वाहतूक करताना आढळून आले असून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चिनावल शिवारामध्ये चिनावलखेडा रस्त्यावर असणाऱ्या सुखी नदीच्या पुलावर आरोपी अजय शांताराम कोळी वय 37 रा . रोझोदा, यश उर्फ योगेश पितांबर चौधरी वय 27 रा. चिनावल आणि असलम सलीम तडवी व 29 रा. लोहारा तालुका रावेर हे तिघे 13 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गुटख्याची वाहतूक करीत असताना आढळून आले,
त्यांच्याकडून रामनिवास, विमल, पानविलास, आधी गुटक्यांची पाकिटे असा एकूण एक लाख 61 हजार रुपयांच्या गुटख्यासह तीन मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहे. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, रमजान तडवी आदींनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम