गुढ्यातील तरूणांसह आबालवृद्धांनी रॅलीत सहभागी होत किशोर पाटलांच्या विजयाची बांधली मोट

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ

बातमी शेअर करा...

गुढ्यातील तरूणांसह आबालवृद्धांनी रॅलीत सहभागी होत किशोर पाटलांच्या विजयाची बांधली मोट

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ

गुढे ता.भडगाव / प्रतिनिधी
पाचोरा भडगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत गुढ्यातील तरूणांसह अबालवृध्द सहभागी होत किशोर पाटलांच्या विजयाची मोट बांधली.
गुढे येथे सकाळी नऊ वाजता रॅलीला सुरवात झाली. बस स्थानकापासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाने सुरुवात झाली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ही अभिवादन करण्यात आले.
गुढ्यातील
गुढ्यातील
त्यानंतर संत सावता महाराज मंदिर, भवानी मंदिर, संत नरहरी चौक, संत सेना महाराज मंदिर आदि भागात ही रॅली काढण्यात आली. रॅलीला गुढेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले.
तर तरूणासंह वृध्दांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देत विजयाची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, बाजार समितीचे उपसभापती पी.ए.पाटील,
गुढ्यातील
गुढ्यातील
पथराडचे भाऊसाहेब पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,
उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, गुढ्याचे सुमित पाटील, राहूल पाटील, आबा फौजी, प्रविण पाटील, प्रकाश हीरे, भगवान पाटील, शिंदिचे योगेश पाटील, गुलाब पाटील,
पाढंरथ चे नारायण पाटील, भाऊसाहेब पाटील, वसंत पाटील, पिचर्डेचे संजय पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
वाड्यात किशोर आप्पांचे जंगी स्वागत
दरम्यान काल वाडे (ता.भडगाव) येथे प्रचार रॅली काढण्यात आली. तेथे प्रत्येक घरी आमदार किशोर पाटील यांचे औक्षण करण्यात आले.
महीलांनी आप्पांना नारळ देऊन विजयाची खात्री दिली. यावेळी एक महीला म्हटली की, मुख्यमंत्र्यानी आम्हाला महिन्याला दिड हजार रूपये देण्याचा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने महीलांचा सन्मान केला आहे.
त्यामुळे महीलांही मुख्यमंत्र्याचे पर्यायाने तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून तुमच्या पाठीशी राहतील. म्हणुन तुमचा विजय पक्का असल्याचे मत मांडले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम