
गुणगौरव सोहळा भविष्यासाठी दिशादर्शक – प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे
गुणगौरव सोहळा भविष्यासाठी दिशादर्शक – प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे
जळगाव प्रतिनिधि गुणगौरव समारंभात मिळालेली प्रेरणा ही आयुष्याला दिशादर्शक ठरते. समाजात असलेल्या स्त्रियांच्या सामाजिक भूमिकेचे महत्त्व लक्षात ठेवून विद्यार्थिनींनी भविष्यात वाटचाल करणे हितावह ठरेल, असे विचार प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वार्षिक गुणगौरव समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
ज्या विद्यार्थिनींना पारितोषिके मिळालेली नाहीत अशा विद्यार्थिनींनी नाउमेद न होता अधिक जोमाने भविष्यात प्रयत्न करावेत असे विचार डॉ. अनिल नेमाडे यांनी मांडले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ व्ही. जे. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळालेल्या आणि प्रत्येक वर्गात गुणाानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या शारदीय नियतकालिकाला क.ब.चौ. उ.म. विद्यापीठातर्फे मिळालेल्या पारितोषिकांचे यावेळी वितरण करण्यात आले.
समारंभाला उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, डॉ. एस.बी. साळवे, सौ. सुनिता पाटील, प्राध्यापक आणि पालक हजर होते. पारितोषिक वितरणाचे वाचन सौ. सविता राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संध्या फेगडे यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम