भाऊसो गुलाबराव फौंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात पालक विद्यार्थी भारावले !

गुणवंत विद्यार्थी हे भविष्यातील तुफानाचे दिवे - व्याख्याते अविनाश भारती !

बातमी शेअर करा...

भाऊसो गुलाबराव फौंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात पालक विद्यार्थी भारावले 

गुणवंत विद्यार्थी हे भविष्यातील तुफानाचे दिवे – व्याख्याते अविनाश भारती !

तरुणांनी मोठे अधिकारी होऊन समाजाचा व गावाचा नावलौकिक वाढवावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

दहावी – बारावीतील 178 गुणवंतांचा व गुरुजानानंचा झाला सत्कार !

पाळधी ता. धरणगाव l प्रतिनिधी

तरुणाईने मोबाईल व्हाट्सअप फेसबुकच्या युगामध्ये जरूर वावरावे पण ज्यांचे बोट धरून आपण चालायला शिकलो व ज्यांच्या खांद्यावर बसून आपण जग पहायला शिकलो अशा आई-वडिलांचा आदर करणे, सन्मान करणे व त्यांच्या चेहऱ्यावर हसू – डोळ्यांमध्ये अभिमान निर्माण होईल असे कार्य करा. गुणवंत विद्यार्थी सोहळा

ज्या दिवशी बापाचे आव्हान स्विकाराल त्यानंतर ध्येयप्राप्ती निश्चित आहे. गुणवंत विद्यार्थी हे भविष्यातील तुफानाचे दिवे असून त्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गुरुजानांवर प्रचंड श्रध्दा व विश्वास ठेवा. त्या विश्वासातूनच आयुष्याची तहान भागणार असल्याचे प्रतिपादन व्याख्याते अविनाश भारती यांनी केले.

तर गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. तरुणांनी मोठे अधिकारी होऊन समाजाचा व गावाचा नावलौकिक वाढवावा. कुटुंब हे आपले देवालय असून त्यातील आई – बाबा हेच आपले साई बाबा आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर भाऊसो गुलाबराव पाटील फौंडेशन आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यांप्रसंगी ते बोलत होते.

गुरुजनांचा सन्मान – गुणवंतांचा सत्कार

गुरुपौर्णिमा निमित्त पालकमंत्री यांचे सेवानिवृत्त शिक्षक अशोक सोनार, गोपाळराव पंडीत, आत्माराम फुलपगार यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच धरणगाव व जळगाव तालुक्यातील दहावी, बारावीत प्रथम व द्वितीय आलेल्या सुमारे 178 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व व्याख्याते अविनाश भारती यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1001 रु. अशा रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गुरू शिष्यांचा सन्माना प्रसंगी उपस्थित भारावले. कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील यांचे व जीपीएस मित्र परिवारचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी व्याख्याते अविनाश भारती यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना जे झेपेल तेच क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वास बाळगा. शिक्षकांच्या माराचे महत्व कमी झाल्याने शिस्त नावाचा प्रकार कमी झाल्याची खंतही व्यक्त केली. तहान लागली की, विहीर खोदणारे अनेक असतात.

मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांचे सामाजिक कार्य महान असून ते फायर ब्रांड नेते असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांमधून कु. यामिनी जनार्दन कोळी व कु. नंदिनी सीताराम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.

मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी भविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करण्याचे आवाहन करून सविस्तर माहिती विषद केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे व प्राचार्य नरेंद्र मांडगे सर यांनी केले तर भाऊसो गुलाबराव फाउंडेशनचे संचालक धनराज कासट यांनी आभार व्यक्त केले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, सरला पवार, शाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील, केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, माजी सभापती ललिताताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे,

अनिल भोळे, पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, जनाआप्पा कोळी, माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, राजेंद्र चव्हाण, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील,

डॉ. कमलाकर पाटील, स्वप्नील परदेशी, जितेंद्र पाटील, संदीप सुरळकर, तुषार महाजन, अजय महाजन, योगेश सोनवणे, सुधाकर पाटील, तालुका संघटक रविंद्र चव्हाण सर, शहर प्रमुख विलास महाजन, गट नेते पप्पू भावे, युवा सेनेचे भैया मराठे, आबा माळी, गोपाल जीभाऊ, महिला आघाडीच्या शोभा ताई चौधरी, भारतीताई चौधरी, पुष्पाताई पाटील, नगरसेवक मनोज चौधरी यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  गुणवंत विद्यार्थी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम