
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चांदसरच्या तिघांवर एक वर्षांसाठी हद्दपारची कारवाई
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चांदसरच्या तिघांवर एक वर्षांसाठी हद्दपारची कारवाई
पाळधी (ता. धरणगाव) : चांदसर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन युवकांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हद्दपार करण्यात आलेले तिघे आरोपी असे :
– आबा ईश्वर कोळी (वय ३०)
– योगेश उर्फ जितेंद्र ईश्वर कोळी (वय २८)
– गणेश सोमा कोळी (वय ३५)
या तिघांविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात अवैध वाळू उपसा, महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला, तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणारे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांची वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोका निर्माण झाल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना २ जून २०२५ पासून एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश काढले आहेत.
या कारवाईची माहिती पाळधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम