गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

बातमी शेअर करा...

गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
​भुसावळ: शहरात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या संदीप बुधा खंडारे (वय २४, रा. दिनदयाल नगर, इंदिरा नगर, भुसावळ) याला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश भुसावळच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या प्रस्तावावर ८ सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला.
​या आदेशानुसार, खंडारेला तात्काळ रेल्वे किंवा रस्ता मार्गाने जिल्ह्याच्या सीमेबाहेर जावे लागेल. या हद्दपारीच्या कालावधीत त्याला जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत येण्यास सक्त मनाई आहे. तसेच, हद्दपारीदरम्यान तो ज्या ठिकाणी वास्तव्यास असेल, त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात दर महिन्याला एकदा आपला पत्ता कळवणे त्याला बंधनकारक असेल.
​या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, यामुळे इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनाही आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम