
गुरुवर्य परशुराम पाटील विद्यामंदिरात रक्षाबंधन उत्साहात साजरा
गुरुवर्य परशुराम पाटील विद्यामंदिरात रक्षाबंधन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या; आपुलकीचा संदेश दिला
जळगाव: के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरात आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली.
इयत्ता पहिलीचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मुलींनी आपल्या वर्गबंधूंना औक्षण करून सुंदर राख्या बांधल्या, तर वर्गबांधवांनी आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत केला.
या कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव आणि गायत्री पवार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका धनश्री फालक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम