
गुरुवर्य महंत प्रा. ह.भ.प. डॉ. सुशील महाराज विटनेरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा
गुरुवर्य महंत प्रा. ह.भ.प. डॉ. सुशील महाराज विटनेरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा
नवलसिंगराजे पाटील यांची विशेष उपस्थिती
अमळनेर | प्रतिनिधी अजिंक्यक्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुरुवर्य महंत प्रा. ह.भ.प. डॉ. सुशील महाराज विटनेरकर (राष्ट्रीय कथाकार व कीर्तनकार) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन अमळनेर येथे करण्यात आले. या सोहळ्याचे औचित्य साधत विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावपाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील विशेष उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमांचे कौतुक करत समाजहितासाठी सातत्याने असे कार्यक्रम घडवून आणावेत, असे मत व्यक्त केले.

मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर , दंतरोग तपासणी शिबिर , मोफत शस्त्रक्रिया सुविधा , पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून वृक्षारोपण या शिबिरांमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मोफत तपासणी व उपचारामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच ह.भ.प. गौरव महाराज यांच्या उपस्थितीने धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच प्रेरणादायी बनले.
गुरुवर्य महंत प्रा. ह.भ.प. डॉ. सुशील महाराज विटनेरकर यांनी आपल्या कथाकथन, कीर्तन व प्रवचनातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक योगदानाची दखल घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात लोकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.
या सोहळ्यामुळे अमळनेर तालुक्यात सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रमांचा संगम घडून आला. आयोजक मंडळाच्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम