गुरु अमृताचा कुंभ – संत गोपाल चैतन्य जी महाराज

पाल येथील श्री वृन्दावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त पन्नास हजारा च्या वर चैतन्य साधकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा...

पाल ता रावेर:-

गुरु हे अमृताचे कलश असून शिष्याला अमरत्व प्रदान करण्याचे महान कार्य करीत असून मनातील विषरूपी विकाराला ज्ञान रूपी आध्यत्मिक तेजाने वाहून भक्ताचे जीवन मान ऊँचविन्याचे कार्य करीत असल्याचे श्री वृन्दावन धाम पाल आश्रमात दी:-१३ जुलै रोजी च्या गुरुपौर्णिमा महोत्सवा निमित्त देशभरातून परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पादुका पूजन व दर्शनाकरिता आलेल्या अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार यांना आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी आपल्या रसाळ अमृत वाणीतुन सत्संग अमृताचा वर्षाव केला. या गुरुपौर्णिमा महोत्सवात महाराष्ट्र समेत पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान , अश्या विविध राज्यतुन किमान पन्नास हजारा च्या वार भविकाची उपस्थिति होती व भरपावसात या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या गुरुपौर्णिमेनिमित्त रावेर खासदार रक्षाताई खडसे , तसेच रावेर यावल चे आमदार शिरीष चौधरी, खंडवा खासदार ज्ञानेश्वर पाटील, माजी खासदार हरिभाऊ राठोड,खासदार प्रतिनिधि नंदा ब्राम्हने, धनंजय चौधरी, भरत महाजन, राजेश वानखेड़े, अजित पाटील, रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पाल चे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, माजी पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील हे आवर्जून उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमात चैतन्य सेवा सेक्युरिटी संघ, भोजन समिति, पदयात्रा समिति, सुरक्षा समिति, पार्किंग समिति, आरोग्य समिति, प्रवेशपत्र सेवा समिति, जल सेवा समिति, विज समिति, पादत्त्राने समिति,मंदिर सुरक्षा समिति यांनी परिश्रम घेतले.
या गुरुपौर्णिमेच्यादिनी सकाळी चारवाजेपासुन पाल आश्रमातील श्री हरिधाम मंदिर मध्ये स्थित परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधी स्थली दर्शन घेण्याकरिता रांग लावली व भर पावसात सुद्धा शिस्तबद्द पद्धतीने कुठलीही पर्वा न करता सुखरूप दर्शन घेतले. त्यानंतर पादुका पूजन व महाआरती होऊन सकाळी नऊ वाजेपासुन कार्यक्रमात आलेल्या मान्यवराचे श्रद्धावचन त्या नंतर दहावी व बारावित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान पत्र देऊन सत्कार केला.त्यानतर विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांचे सत्संग व गुरुदीक्षा चे कार्यक्रम सम्पन्न झाले.या गुरूपौर्णिमेत सर्व प्रशासकीय यंत्रनेचे मोलाचे सहकार्य लाभले.
————

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम