
गुरु चांगल्या गुणांची शिकवण देतात – दादा महाराज जोशी
गुरु चांगल्या गुणांची शिकवण देतात – दादा महाराज जोशी
जळगाव – गुरु शिष्यामधील वाईट गुण कमी करून चांगल्या गुणांची वाढ करीत शिकवण देत असतात असे ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी प्रतिपादन केले.
गांधी उद्यानासमोरील श्री चिमुकले राम मंदिरात कै.वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठान आयोजित गुरु पूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
जहागिरदार प्रतिष्ठानच्या ३१ वर्षांच्या व चार पिढ्यांनी सुरू ठेवलेल्या रुग्णसेवा व गुरुपूजनाच्या परंपरेचे सातत्य म्हणजे ईश्वराची,
गुरूंची आणि आई-वडिलांची कृपा आहे असे ते म्हणाले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयंत जहागिरदार यांनी दादामहाराज जोशी
यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन गुरुपूजन व अध्यक्षीय भाषण केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आनंद दशपुत्रे यांनी केले. प्रारंभी धन्वंतरी स्तवन व पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमास आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. पी.आर.भंगाळे, डॉ. विकास चौधरी, डॉ. पराग जहागिरदार, डॉ. विकास चौधरी, डॉ. अपला जहागिरदार, डॉ. अमित चौधरी, डॉ. हर्षवर्धन जोशी, डॉ. लोकेश चौधरी, डॉ. आदित्य जहागिरदार, डॉ. विवेक वडजीकर या मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी दीपक चंदनकर, उमाकांत पाटील, भिकन ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम