
गुरे चारण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा तलावात बुडून मृत्यू
गुरे चारण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा तलावात बुडून मृत्यू
अमळनेर : तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या ५६ वर्षीय प्रौढाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खेडी व्यवहारदळे येथील आनंद सोनू मालचे (वय ५६) हे १ रोजी सकाळी ९ वाजता गावातील शेतकऱ्यांच्या म्हशी घेऊन ते तलाव परिसरात म्हशी चारण्यासाठी गेले होते.
दरम्यान, काही वेळानंतर आनंदमालचे यांच्या चपला व पिशवी तलावाच्या काठावर आढळून आली. मात्र, ते दिसत नसल्याने इतरांना शंका आली. त्यांनी त्यांचे नातेवाईक व पोहोणाऱ्यांना बोलावून घेतले. तर तलावात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह तलावातच आढळून आला. म्हशी तलावात पाणी पिण्यासाठी गेल्या होत्या, त्यांना काढण्यासाठी ते उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय रामकृष्ण कुमावत करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम