गुर्जर उद्योग परिषदेतर्फे महेंद्र पाटील यांचा सत्कार

झिरो टू हिरो कार्याची दखल

बातमी शेअर करा...

गुर्जर उद्योग परिषदेतर्फे महेंद्र पाटील यांचा सत्कार

झिरो टू हिरो कार्याची दखल
अडावद ता. चोपडा प्रतिनिधी
समाजातील लहान उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही केलेल्या कार्याची दखल घेत अशा उद्योजकांचा गुणगौरव दि.१६ मार्च २०२५ रोजी अंबरनाथ येथे करण्यात आला.
‌या प्रसंगी सुनिल चौधरी (अध्यक्ष, दोडेगुजर मंडळ, मुंबई कोकण) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
गुजर समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, कामाची संधी उपलब्ध करून देणे, विविध उद्योग उद्योग व्यवसाय, शेती व्यवसाय, व्यापार, कुटिरोद्योग करत असणा-या लहान उद्योजकांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अगदी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वरगव्हाण गावातील महेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या उत्तुंग भरारी ची दखल घेत सुनिल चौधरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महेंद्र पाटील हे वरगव्हान येथील गरीब व अल्पभूधारक कुटुंबातील असुनही त्यांनी १२वी नंतर काहीतरी करण्याची जिद्द बाळगून पुणे गाठले. काही दिवस कामगार म्हणून काम करून नंतर स्वत:च्या कर्तृत्व व मेहेनतीने पुणे येथे इंद्रायणी सर्विसेस नामक कंपनी सुरू करून तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज त्यांच्या कडे शेकडो मुलांना उद्योग रोजगार उपलब्ध होत आहे.त्यांच्या या झिरो टू हिरो कार्याची दखल घेत गुजर समाजाने त्यांचा यथोचित सत्कार केला.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम