
वीर गुर्जर सेनेतर्फे स्व कर्नल किरोडी सिंह बैंसला यांची जयंती उत्साहात साजरी
वीर गुर्जर समाजाचे ज्येष्ठ नेते कर्नल किरोरी सिंह बैंसला यांची जयंती उत्साहात साजरी
वीर गुर्जर सेनेतर्फे स्व कर्नल किरोडी सिंह बैंसला यांची जयंती उत्साहात साजरी
गुर्जर समाजाचे ज्येष्ठ नेते कर्नल किरोडी सिंह बैंसला यांची जयंती उत्साहात साजरी
जळगाव / प्रतिनिधी
राजस्थानमधील गुर्जर समाजाचे ज्येष्ठ नेते व आरक्षण आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करणारे कर्नल किरोरी सिंह बैंसला यांची जयंती गुरुवारी (दि. १२ सप्टेंबर) दुपारी १ वाजता पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

कर्नल बैंसला हे राजस्थानमधील रेल रोको आंदोलनाचे शिल्पकार असून गुर्जर समाजात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील, वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव पाटील,
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण पाटील, विजय पाटील (निरूळ पाडळे) ह मु. वापी ( गुजरात ) निर्जला बाई पाटील, मयूर पाटील, अनिल पाटील, महेश पाटील, अनिल चौधरी यांच्यासह समाजातील बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कवी साहित्यिक सूत्रसंचालक प्रफुल्ल नाना पाटील ( वडनगरीकर ) यांनी सूत्रसंचालन केले .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम