
गूढ आवाजामुळे चाळीसगावकरांमध्ये घबराट
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
गूढ आवाजामुळे चाळीसगावकरांमध्ये घबराट
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
चाळीसगाव प्रतिनिधी
तालुक्यातील रहिवाशांनी सायंकाळी सुमारे ५ वाजता दोन वेळा मोठा आवाज आणि जमिनीतील हलकासा कंपन अनुभवला, ज्यामुळे घबराट पसरली आणि नागरिक घराबाहेर आले. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचे सांगितले, तर इतरांनी तो आकाशातील घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला.
घटनेची तात्काळ दखल घेत, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या माहितीनुसार, भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही, त्यामुळे आवाज आणि कंपन भूकंपाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम