‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून  विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

बातमी शेअर करा...

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून  विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

 

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा मोठ्यासंख्येने सहभाग

जळगाव, – जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “आर्यभट्ट ते गगनयान” या संकल्पनेवर आधारित गॅलेक्सी पेंटिंग स्पर्धा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.

सदर उपक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी  विद्यार्थ्यांना संबोधित करताना अवकाश संशोधनाचा इतिहास, भारताची प्रगती आणि आगामी अंतराळ मोहिमा याबाबत माहिती दिली. तसेच भारताच्या ‘आर्यभट्ट’ उपग्रहापासून ते ‘गगनयान’ मोहिमेपर्यंतचा प्रवास हा भारतीय शास्त्रज्ञांच्या बुद्धिमत्तेचे आणि चिकाटीचे द्योतक असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी हे केवळ गणिते, प्रयोग किंवा यंत्रे यापुरते मर्यादित नसून कल्पकता, नवोन्मेष आणि सर्जनशील विचार यांचे संगम आहे असे सांगत विज्ञान आणि कला यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विश्वाचे सौंदर्य आणि गूढता चित्रातून व्यक्त केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

या उपक्रमात १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सहभागींनी सर्पिल आकाशगंगा, नेब्युला, कृष्णविवर, वैश्विक दृश्ये अशा विविध कल्पनांना कॅनव्हासवर साकारले. प्राध्यापकांच्या पॅनेलने सर्जनशीलता, कल्पकता आणि विषयाशी सुसंगतता यावर आधारित चित्रांचे मूल्यमापन केले. निवडक कलाकृतींना प्रमाणपत्रे व बक्षिसांनी गौरविण्यात आले तसेच महाविद्यालयीन कलादालनात प्रदर्शित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाबद्दलची उत्सुकता वाढली, तसेच विज्ञानासोबत कलात्मक अभिव्यक्तीला वाव मिळाला. “गॅलेक्सी पेंटिंग” स्पर्धेमुळे राष्ट्रीय अंतराळ दिनाचा उत्सव अधिक प्रेरणादायी ठरला. सदर उपक्रमाचे  प्रा. जितेंद्र वडदकर तसेच प्रा. सुरेखा वाणी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम