गेट-टुगेदरचा अनोखा अर्थ : चहार्डीच्या विद्यार्थ्यांनी उभारला स्मशानभूमीत शेड”

बातमी शेअर करा...

गेट-टुगेदरचा अनोखा अर्थ : चहार्डीच्या विद्यार्थ्यांनी उभारला स्मशानभूमीत शेड”

चोपडा प्रतिनिधी तालुक्यातील चहार्डी येथील शामराव शिवराम पाटील विद्यालय येथील इ. दहावी (2005-2006) च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आहे. दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व मित्रांनी एकत्र येऊन गेट-टुगेदर आयोजित केला. मात्र हा कार्यक्रम केवळ भेटीगाठीपुरता न ठेवता त्यांनी गावासाठी काहीतरी उपयुक्त करण्याचा संकल्प केला.

या भावनेतून सर्व मित्रांनी स्मशानभूमी, चहार्डी येथे मुंडन करण्याठीसाठी एक शेड उभारण्याचे काम हाती घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीने मेहनत घेऊन हे काम यशस्वीपणे पूर्ण केले. या उपक्रमामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या ग्रामस्थांना सोयीचे ठरणार असून, गावात या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील नागरिक तसेच माजी शिक्षकवर्गांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, “शिक्षणाने दिलेली मूल्ये कृतीत उतरविण्याचा हा आदर्श उपक्रम आहे” अशी भावना व्यक्त केली.

सर्व विद्यार्थ्यांचे एकत्र येणे, आठवणींना उजाळा देणे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना . या गेट-टुगेदरने खऱ्या अर्थाने ‘मित्रत्व आणि सामाजिक जबाबदारी’ यांचा संगम घडविला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम