
गोडाऊन फोडून ८.३५ लाखांच्या पापड मसाल्याच्या ७१ गोण्या चोरी
एमआयडीसी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
गोडाऊन फोडून ८.३५ लाखांच्या पापड मसाल्याच्या ७१ गोण्या चोरी
एमआयडीसी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
जळगाव प्रतिनिधि
शहरातील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्सच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ‘राम बंधू’ पापड मसाल्याच्या ७१ गोण्या चोरल्याचा प्रकार २६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आला. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोडाऊनचे मालक अतुल विश्वनाथ मुळे (वय ५९, रा. जीवन मोती सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) यांनी ‘एम’ सेक्टरमध्ये श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोडाऊन सुरू केले आहे. या ठिकाणी ‘राम बंधू’ पापड मसाल्याच्या बंद पाकिटांच्या गोण्या साठवणुकीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
२४ ते २६ मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकवून आत प्रवेश केला आणि ८.३५ लाख रुपये किमतीच्या ७१ गोण्या लंपास केल्या. २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता ही चोरी लक्षात आल्यानंतर मुळे यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी २७ मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम