गोदामातून दीड लाखांच्या गुटख्याचा साठा जप्त

यावल तालुक्यातील साकळी येथील घटना

बातमी शेअर करा...

गोदामातून दीड लाखांच्या गुटख्याचा साठा जप्त

यावल तालुक्यातील साकळी येथील घटना

यावल I प्रतिनिधी

गोदामामध्ये ठेवलेला गुटख्याचा १ लाख ६५ हजार ९७६ रुपयांचा साठा जप्त करुन शनिवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना साकळी येथे उघडकीस आली आहे.

साकळी येथील भोनक नदीच्या काठावर चिंटू वाणी याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौरदार अस्लम खान, सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलीस नाईक मोहसीन खान, अनिल साळुंखे, अरशद गवळी, मुकेश पाटील, राजेंद्र पाटील या पथकाला त्यांनी कारवाईसाठी पाठवले. त्याठिकाणी छापा टाकला असता या गोदामातून प्रतिबंधित १ लाख ६५ हजार ९७६ रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात हवालदार योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम