
गोदावरी अभियांत्रिकीत अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन२५ स्पर्धा उत्साहात
गोदावरी अभियांत्रिकीत अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन२५ स्पर्धा उत्साहात
जळगाव — येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतर्गत हॅकेथॉन स्पर्धा स्मार्ट इंडिया हॅकथॉन २५ उत्साहात संपन्न झाली.
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ हा एआयसीटीई आणि मिनीस्ट्री ऑफ एज्युकेशन द्वारे सुरू केलेला राष्ट्रीय उपक्रम आहे, कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. तुषार कोळी हे उपस्थित होते. प्रमुख पर्यवेक्षक म्हणून प्रा. डॉ. टी. के. गवळी (सहाय्यक प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव),श्री मनोज कुमावत (संचालक पॅशन सॉफ्टवेअर सोल्युशन, जळगाव), डॉ. व्ही. डी. चौधरी (सहाय्यक प्राध्यापक, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव). हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. अतुल बर्हाटे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी स्मार्ट इंडिया याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. व या स्पर्धेचा उद्देश्य विद्यार्थ्यांना सांगून राष्ट्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी आहे असे नमूद केले. स्पर्धेमध्ये ५६ टीम सहभागी झाल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत ट्रॉफीज प्रदान करण्यात आली. समारोपप्रसंगी डॉ. टी. के. गवळी तसेच श्री मनोज कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेल्या सादरीकरण बद्दल कौतुक केले व व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सूचना केल्या व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रथम क्रमांक. टीम अल्गोरिदम अलायन्स उत्कर्ष पाटील, शेख अल्तमश, साहिल पिंजारी, देवेश पाटील, तेजल वराडे, डिंपल पाटील, द्वितीय क्रमांक टीम टेक्नोवा गौरव पाटील, सानिका कासार, सर्वेश पाटील, कल्याणी पाटील, केतन पाटील, सत्यजित हिंगे.तृतीय क्रमांक टीम प्रॉब्लेम बूस्टर प्रथमेश पवार, सेजल जाधव, अनुष्का चौधरी, राज सुतार, साहिल भोळे, भारद्वाज पाटील.सदर कार्यक्रमा चे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तुळजा महाजन, दामिनी पाटील, प्रज्ञा जंजाळ, शिवगंगा चिकाटे, पायल सूर्यवंशी तसेच या विद्यार्थ्यांनी केले.तसेच सदर कार्यक्रमा साठी विभागीय प्रकल्प प्रतिनिधी डॉ. निलेश चौधरी, डॉ. विजय चौधरी, प्रा. किशोर महाजन, प्रा. सचिन महेश्री, प्रा. जयश्री पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी डॉ. अतुल बर्हाटे,प्रा. तुषार कोळी(अधिष्ठाता), डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) यांचे मार्गदर्शन लाभले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव) तसेच डॉ. केतकी पाटील(सदस्य) डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम