गोदावरी अभियांत्रिकीत इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळा उत्साहात

बातमी शेअर करा...

गोदावरी अभियांत्रिकीत इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (स्वायत्त संस्था) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दिनांक २७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित चार दिवसीय इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय चौधरी (संचालक, इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर) हे उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, तसेच प्रा. हेमंत इंगळे (विभागप्रमुख) आणि प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत होतेे. कार्यशाळेत इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक घटकांचे सिम्बॉल, टेस्टिंग पद्धती, फॉल्ट फाइंडिंग तंत्र, कार्यप्रणाली, अनुप्रयोग तसेच कोडिंगचे मूलभूत ज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मल्टीमीटर, ब्रेडबोर्ड, रेसिस्टर्स, ट्रान्झिस्टर, डायोड, कॅपेसिटर, आणि खउ सर्किट्सच्या सहाय्याने प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी देण्यात आली.

या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना सर्किटमधील त्रुटी ओळखणे, त्या दूर करणे आणि सर्किटची कार्यक्षमता तपासणे याचा मौल्यवान व्यावहारिक अनुभव मिळाला.कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थिअरी ते प्रॅक्टिकल हा बदल प्रत्यक्ष अनुभवता आला.

समारोपावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करताना सांगितले की, या सत्रामुळे त्यांना तांत्रिक आत्मविश्वास वाढीस लागला असून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हाताळताना अधिक सुलभता आली आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील वास्तव परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतील. भविष्यातील एम्बेडेड सिस्टम्स, खेढ, आणि हार्डवेअर डिझाइन यांसारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ही एक भक्कम पायरी ठरेल.कार्यशाळेचे आयोजन आणि समन्वय प्रा. आर. व्ही. पाटील व प्रा. महेश एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

सूत्रसंचालन तुळजा महाजन हिने केले. सदर कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम