
गोदावरी अभियांत्रिकीत उल्हास २ के २५ वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात प्रारंभ
दि २९ रोजी समारोप
गोदावरी अभियांत्रिकीत उल्हास २ के २५ वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात प्रारंभ
दि २९ रोजी समारोप
जळगाव प्रतिनिधि
गोदावरी अभियांत्रिकीच्या उल्हास २ के २५ वार्षिक स्नेहसंमेलाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदापूजनाने करण्यात आले. यावेळी प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन),प्रा. अमित म्हसकर (स्नेहसंमेलन समन्वयक) सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. दि २९ रोजी समारोप केला जाणार आहे.
आज सांस्कृतिक व समूह दिन साजरा करण्यात आला, पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध समृह तयार करत धमाल मस्ती केली. विजेते प्रथम फॅब फाईव गृप द्वितीय टीम इंडिया तृतीय द क्रेझी क्रू समन्वयक प्रा. रुचिता बारी, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत शिंदे प्रा. भावना झांबरे यांनी काम पाहिले.सुत्रसंचालन देवयानी पाटील, पूर्वा चौधरी, रेणुका सपकाळे, करिष्मा नारखेडे, कनिष्का सुरवाडे व सार्थकी चौधरी या विद्यार्थिनींनी केले.
तर दुस—या सत्रात सांस्कृतिक दिनानिमीत्त भारतीय संस्कृतिचे सादरीकरण करण्यात आले. विजेते प्रथम संजना नेमाडे व गृप द्वतीय पंकज साळी व गृप तृतीय काजल पाटील गृप.समन्वयक प्रा. रुचिता पाटील,पर्यवेक्षक डॉ. सरोज भोळे प्रा. चेतन विसपुते तर सूत्रसंचालन तरन्नुम पिंजारी, हर्षा धांडे, चैताली मरमट, रोशनी राजपूत, मेघा सोनवणे, मोहीश नारखेडे व यतीश भारंबे या विद्यार्थ्यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम