
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
जळगाव : गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत दोन दिवसीय शिक्षक क्षमता बांधणी कार्यशाळेचा समारोप आज करण्यात आला.
उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून क.ब. चौ. उम वि मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य डॉ. सुरेखा पालवे, विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन मॅनेजमेंटचे चेअरमन डॉ. पराग नारखेडे, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संचालक डॉ. प्रशांत वारके तसेच प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली.
डॉ. सुरेखा पालवे यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सातत्याने प्रगती साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच शिक्षकांनी नवीन कौशल्य आत्मसात करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज त्यांनी मांडली. डॉ. मनमोहन सिंग आणि डॉ. रघुराम राजन हे देखील सुरुवातीच्या काळात प्राध्यापक होते, दाखला देत शिक्षकांना मार्गदर्शन केले., डॉ. पराग नारखेडे यांनी एनएपी पॅटर्न, क्रेडिट प्रणाली, टिचिंग-लर्निंग प्रोसेसेस, नॅक निकष याबाबत सविस्तर विवेचन केले. बदलत्या शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या नोट्सची गरज, शैक्षणिक नेतृत्व, बौद्धिक भांडवलाचे महत्त्व, ज्ञान व्यवस्थापन आणि संस्था परिणाम यावरही मार्गदर्शन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय आणि पीएम-उषा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यापीठ क्षेत्रातील ३० प्राध्यापक सहभागी झाले असून समारोपप्रसंगी त्यांना विद्यापीठातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आफ्रीन खान यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम