
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अॅडव्हान्स स्किल वर्कशॉप संपन्न
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अॅडव्हान्स स्किल वर्कशॉप संपन्न
जळगाव प्रतिनिधी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव तर्फे जीआयएनआर फॉउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने एसीएलएस,बीएलएस,पीएलएसचे वर्कशॉप नुकतेेच संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन मेडिकल-सर्जिकल नर्सिंग विभाग तसेच फंडामेंटल ऑफ नर्सिंग विभाग यांनी संयुक्तरीत्या केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला.या कार्यशाळेसाठी संसाधन व्यक्ती म्हणूनश्री. बलराम कथलिया ( मुख्य सिम्युलटर इस्ट्रक्टर) आणि मिस स्टेफी अब्राहम (सहायक प्राध्यापक) यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची योग्य काळजी कशी घ्यावी, सीपीआरचे योग्य तंत्र तसेच टीमवर्कचे महत्त्व याबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी दोन्ही विभागातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.अशा प्रकारच्या वर्कशॉपमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवांविषयी आत्मविश्वास आणि कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम