गोरक्षकांसह पोलीस पाटलांवर हल्ला करणाऱ्या सहा जणांना अटक

अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे वाहन बांबविण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा...

गोरक्षकांसह पोलीस पाटलांवर हल्ला करणाऱ्या सहा जणांना अटक
अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे वाहन बांबविण्याचा प्रयत्न
सावदा प्रतिनिधी

येथील मोठा वाघोदा येथे बन्हाणपुर अंकलेश्वर ममहामार्गावरून अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे वाहन बांबविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हल्लेखोरांनी गौरक्षांसह पोलीस पाटील यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहा संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली.

कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गोवंशाची बाहन थांचविणाऱ्या गोरक्षकांवर वाघोदा येथील चाळीस ते पन्नास हाललेखोरांनी हल्ला केला होता. यामध्ये पोलीस पाटील परशुराम भोसले, गौरक्षक कुलदीप पवार, केतन पाटील, निखिल

महाजन, कुग्याल नारखेडे, यांना बेदम मारहाण केली, यातील गौरक्षक कुलदीप पवार यांच्या कडील महागडा मोबाईल हिसकावून घेतला होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यासह आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकात पाटील गांनी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित बबलू उर्फ फिरोज तडवी, शरीफ भिकारी तडवी, तौसिफ शरीफ तडवी, सय्यद फैजान सय्यद, रोख आम शेख रऊफ, तौसिफ मलक, सुबान माना तडवी, रमजान सुबान तडयी, रमजान रसूल तडवी, रहीमसलीम तडवी, सर्व राहणार वाघोदा बुद्रुक यांना अटक करण्यात आली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम