गोलाणी मार्केटमधील थकबाकी असणारे दोन व्यापाऱ्यांचे गाळे सील
महापालिकेची थकबाकी वसुल करण्याची मोहीम
गोलाणी मार्केटमधील थकबाकी असणारे दोन व्यापाऱ्यांचे गाळे सील
महापालिकेची थकबाकी वसुल करण्याची मोहीम
जळगाव I प्रतिनिधी
थकबाकी वसुल करण्याची मोहीम महापालिकेने तीव्र केली असून . थकबाकी न भरणाऱ्यांचे दोन गाळे सील करण्यात आले आहेत.
महापालिकेचे शहरात तब्बल २५ व्यापारी संकुल आहेत. त्यातील अनेक गाळेधारकांकडे मोठया प्रमाणात थकबाकी असल्याची माहिती महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाने दिली आहे. आता या गाळेधारकाकडील वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या किरकोळ विभागाच्या वसुली पथकाने आज गोलाणी व्यापारी संकुलात वसुली मोहीम राबवून थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांचे दोन गाळे सील करण्यात आले आहेत. तसेच दोन लाख रूपये वसुल करण्यात आले आहेत. उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधीक्षक गौरव सपकाळे, राजु शिंगटे, संजय दाभाडे, कोतकर, बनसोडे आदीनी कारवाई केली
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम