गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश !

बातमी शेअर करा...

गोल्डन शॉट : प्रियदर्शिनी त्रिपाठीचे नेमबाजीत सुवर्ण यश !
जळगाव : पायोनियर क्लब, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अंडर-१७ रायफल शूटिंग स्पर्धेत जळगावच्या प्रियदर्शिनी त्रिपाठी हिने सुवर्णपदक पटकावत आपल्या प्रतिभेची चमकदार छाप पाडली.

फ्युचर अँड गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव हिचे प्रतिनिधित्व करताना प्रियदर्शिनीने अचूक नेमबाजी, एकाग्रता आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय यशामध्ये गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, तसेच शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी आणि क्रीडा शिक्षक मयूर पाटील व ममता प्रजापती यांच्या सततच्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा आहे. प्रियदर्शिनीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे अथक परिश्रम, त्याग आणि प्रेम हेच तिच्या उड्डाणाला बळ देणारे पंख ठरले. त्यांच्या प्रेरणेतूनच तिने सुवर्णपदक जिंकत शाळा, संस्था आणि शहराचे नाव उज्वल केले. प्रियदर्शिनीचे हे यश केवळ सुरुवात आहे. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचे ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम