गोवंश कत्तलीच्या संशयातून दोघांवर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा...

गोवंश कत्तलीच्या संशयातून दोघांवर प्राणघातक हल्ला

चोपडा तालुक्यातील लोणी येथील घटना

जळगाव प्रतिनिधी : गोवंश कत्तलीचा संशय व्यक्त होताच तेथील परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांवर गुरुवार ११ डिसेंबर रोजी रात्री स्थानिक एका गटाकडून झालेल्या हिंसक हल्ल्याने खळबळ निर्माण होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील लोणीयेथे घडली रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.कृष्णा भिल (१८, रा. जामनेर) आणि योगेश महाराज कोळी (३५, रा. जळगाव) अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

लोणी गावात गोवंश कत्तलीचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा भिल, योगेश कोळी आणि त्यांच्यासोबत असलेले अन्य तरुण लोणी येथे गेले होते. त्यांनी परिस्थितीवर आक्षेप घेताच काहींनी शिवीगाळ करत त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी चॉपर, कोयते आणि लोखंडी रॉडसारखी घातक हत्यारे वापरल्याची माहिती मिळाली आहे. योगेश कोळी यांच्या मांडीवर गंभीर वार झाले असून दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. घटनाची खबर मिळताच कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक रुग्णालयात दाखल झाले, तर पोलिसांनी लोणी गावात आणि रुग्णालय परिसरात परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवले.
या संपूर्ण प्रकरणामुळे चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम