गो. से. महाविद्यालयातील शस्त्रे व नाणे प्रदर्शनाला खामगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इतिहास विभाग व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यञ्च संयुक्त उपक्रम

बातमी शेअर करा...

गो. से. महाविद्यालयातील शस्त्रे व नाणे प्रदर्शनाला खामगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इतिहास विभाग व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यञ्च संयुक्त उपक्रम

खामगाव :प्रतिनिधि

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो.से विज्ञान,कला व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चांदूर,बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाचे मुक साक्षीदार,विदर्भाचे शस्त्रागार या दोन दिवसीय शस्त्रे व नाणे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनातील शिवकालीन शस्त्रे व प्राचीन दुर्मीळ नाणी पाहण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक तसेच खामगाव व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक 24/02/2025 रोजी सकाळी 11 वाजता मा.श्री अशोकजी थोरात (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष, वि. शि. प्र. मंडळ, खामगाव), तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. अजिंक्यजी बोबडे (कोषाध्यक्ष, वि. शि. प्र. मंडळ, खामगाव), श्री. शिवाभाऊ काळे (अध्यक्ष स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, चांदूर बाजार ) श्री.राजेश पाटील (नाणे संग्रहक व अभ्यासक), आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मा. अशोकजी थोरात साहेब यांनी मराठा कालखंडातील युद्ध कला व त्यामध्ये वापरण्यात आलेल्या विविध शस्त्रांचे महत्त्व सांगितले. प्रा. राजेश पाटील यांनी इतिहासात नाण्यांचे असणारे महत्त्व विशद करताना, नाणे राज्याच्या आर्थिक संपन्नतेचे प्रतीक समजले जाते, नाण्यांवरूनच इतिहासातील राजवंश,शासक यांच्या काळातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय तसेच सांस्कृतिक स्थिती समजण्यास मदत होते

 

हे समजावून सांगितले. त्याचबरोबर मा. श्री. शिवा काळे यांनी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या शिवकालीन धोप तलवारी, पट्टा, खंडा, जबरदंड, मराठा, मोगल, राजस्थानी कट्यारी,जंबिया, बिचवे, छोटी तोफ व तोफांचे लहान मोठे गोळे, विविध प्रकारच्या कुऱ्हाडी, धनुष्यबाण, ढाल, त्याचबरोबर लहान-मोठी असे शंभरहुन अधिक शस्त्रे या सर्वांची इत्यंभूत माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर यांनी, विद्यार्थ्यांनी इतिहासातून कोणता बोध घ्यावा व आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत याची जाणीव ठेवावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. एम. एस. वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख प्रा. एस. एम. शिंदे यांनी केले.उद्घाटनानंतर हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. खामगावकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेटी देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना, असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजना मागे मार्गदर्शक म्हणून डॉ. पी. पी. ठाकूर, डॉ. एस. टी. वराळे, डॉ. डी. एन. व्यास, डॉ. एच. ए. भोसले यांचा मोलाचा वाटा होता. कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागाचे प्रा.एस.एम.शिंदे प्रा.एस.एस.कापसे, प्रा.आर.व्ही.ढाकणे,प्रा.एम.एस.वाघमारे प्रा.पी.एल.बानाईत यांनी केले.तसेच डॉ.किशोर वानखेडे डॉ.जयेश तातेड व ग्रंथपाल श्री. गुडभेले सर व सर्व ग्रंथालय कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. सुभाषजी बोडबे, संस्थेचे सचिव मा. डॉ. प्रशांत बोबडे यांनी कौतुक केले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम