
गो. से. महाविद्यालयात शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाणे प्रदर्शन
इतिहास जिवंत करणारा आगळा-वेगळा उपक्रम
गो. से. महाविद्यालयात शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाणे प्रदर्शन
इतिहास जिवंत करणारा आगळा-वेगळा उपक्रम
खामगाव प्रतिनिधी
इतिहास प्रेमींसाठी आणि संशोधकांसाठी एक सुवर्णसंधी! विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाचे मुक साक्षीदार – विदर्भाचे शस्त्राधार” या भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दि : 24/02/2025 रोजी सकाळी 11 वाजता मा. श्री. अशोकजी थोरात (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष वि.शि. प्र. मंडळ खामगाव) व प्रमुख अतिथी म्हणून श्री. अजिंक्यजी बोबडे (कोषाध्यक्ष वि. शि. प्र. मंडळ खामगाव), श्री. राजेश पाटील (नाणे संग्रहक व अभ्यासक), श्री. शिवा काळे (अध्यक्ष, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, चांदुर बाजार) हे उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनीत शिवकालीन शस्त्रांचा अद्वितीय ठेवा, दुर्मिळ ऐतिहासिक नाणी आणि त्या काळातील अस्सल वारसा उलगडण्यात येणार आहे. ऐतिहासिक शस्त्रसंस्कृती आणि समृद्ध परंपरेचा साक्षात्कार घडवणारा हा उपक्रम सोमवार, २४ फेब्रुवारी आणि मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे.
शिवकालीन शौर्याचा, ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार होण्याची ही अनोखी संधी नक्कीच दवडू नका! इतिहासप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि सर्व नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला भेट देऊन भूतकाळाचा रोमांचक प्रवास अनुभवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवनकर व इतिहास विभागातर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम