
गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी महसूल विभागाची कारवाई!
गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी महसूल विभागाची कारवाई!
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील बोहरा गावात महसूल विभागाच्या पथकाने दि. १२ रोजी पहाटे अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान महसूल पथकाला एक अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले. तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले व ते अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. महसूल विभागाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
या मोहिमेत महसूल विभागाच्या पथकातील मनोहर भावसार (ग्राम महसूल अधिकारी), पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे भाग), भुषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, बोहरा), कल्पेश कुँवर (ग्राम महसूल अधिकारी, रणाईचे), सचिन बमनाथ (ग्राम महसूल अधिकारी), ए. बी. सोनवणे (ग्राम महसूल अधिकारी, अमळनेर), अमोल चक्र (ग्राम महसूल अधिकारी), आशीष पारधे (ग्राम महसूल अधिकारी, जोगी) आणि अभिमन जाधव (ग्राम महसूल अधिकारी) यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाची कठोर भूमिका अधोरेखित झाली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उपशावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम