
गौलखेड येथील शासकीय मालमत्ता असलेल्या गोडाऊनची अवैधरित्या तोडफोड..
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार ; कारवाईची मागणी..
गौलखेड येथील शासकीय मालमत्ता असलेल्या गोडाऊनची अवैधरित्या तोडफोड..
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार ; कारवाईची मागणी..
शेगांव / प्रतिनिधी
तालुक्यातील गोलखेड येथील सहायता बचत गटाच्या शासकीय मालमत्ता असलेल्या गोडाऊनची जेसीबीव्दारे अवैधरित्या तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुरूषोत्तम भाऊराव शेजोळे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका तक्रारीव्दारे केली आहे.
तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की,गौलखेड गावामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा व सुवर्ण ग्राम रोजगार योजनेअंतर्गत स्वयम सहायता बचत गटाला शासनाने रोड टच लाखो रुपये खर्च करून मजबूत गोडाऊन बांधुन दिलेले आहे. सदर गोडाऊन व इमारत सुस्थितीत असताना सुद्धा जेसीबी च्या सहाय्याने दि. ०१/०१/२०२५ रोजी सकाळी ९०% गोडाऊन शेडला पाडून उध्वस्त करण्यात आले आहे व शासकीय निधीचे नुकसान केले आहे व पक्का असलेला मजबूत हेवी टीनपत्रे, चायनल, अँगल, विटा या साहित्याचा हितचिंतकांना लाभ होण्यासाठी सर्व साहित्य काही दिवसात लंपास करण्यासाठी संबंधित अधिका-याने कोणाच्या तरी आदेशावरून मुभा दिली होती. या गोडाऊन पाडणे प्रकरणाची आपल्या कार्यालयाकडून तत्काळ चौकशी करावी आणि त्या प्रकरणाची जवाबदारी निश्चित करून संबंधीतांवर कारवाई करावी व इमारत पाडण्याकरण्याकरिता कोणतीही परवानगी घेतली नाही, घेतली असल्यास त्या परवानगीची प्रत सुद्धा मला देण्यात यावी. ग्राम भकास करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी तसेच स्वयंरोजगार बचत गटांना तत्काळ गोडाऊन उपलब्ध सुद्धा करून द्यावे अशीही मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम