ग्राहकांनी फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे – विजय मोहरीर

ग्राहकांचे अधिकार व फसवणुकीपासून संरक्षण यावर व्याख्यान

बातमी शेअर करा...

ग्राहकांनी फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे – विजय मोहरीर

ग्राहकांचे अधिकार व फसवणुकीपासून संरक्षण यावर व्याख्यान

जळगाव – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्या व व्यक्ती जाहिरातीत अवास्तव दावे करीत असतात. या फसव्या जाहिरातींपासून ग्राहकांनी सावध राहावे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत पदाधिकारी विजय मोहरीर यांनी प्रतिपादन केले.
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ग्राहकांचे अधिकार व फसवणुकीपासून संरक्षण या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
मंचावर अध्यक्ष विनीत जोशी, प्रकल्प सचिव तुषार तोतला यांची उपस्थिती होती.
आपल्याकडे कोणते प्रॉडक्ट आहे, हे ग्राहकांना कळण्यासाठी जाहिरात करावी लागते. या जाहिरातीत कंपन्या व प्रसिद्ध व्यक्ती विविध अवास्तव दावे करतात. जे सामान्य माणसांच्या सहज लक्षात येत नाही,

मात्र ग्राहक पंचायत या चळवळीतील कार्यकर्त्यांना या क्षेत्रात काम केल्यामुळे ते लवकर कळते असे मोहरीर यांनी सांगितले.
आपण गेल्या ३५ वर्षापासून तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत ५० वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती त्यांनी देत अनेक उदाहरणे सांगितली. प्रारंभी भूषण गुरव यांनी परिचय करून दिला. माजी अध्यक्ष योगेश भोळे यांच्या हस्ते मोहरीर यांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण बगडिया यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम