ग्राहकाला बोलविण्याच्या कारणावरून कापड विक्रेते भिडले

जळगाव शहरातील काँग्रेस भवनासमोरील घटना

बातमी शेअर करा...

ग्राहकाला बोलविण्याच्या कारणावरून कापड विक्रेते भिडले

जळगाव शहरातील काँग्रेस भवनासमोरील घटना

जळगाव प्रतिनिधी
ग्राहकाला कपडे विक्री करीत असताना त्या ग्राहकाला दुसऱ्या कापड विक्रेत्याने बोलाविल्याने झालेल्या वादातून दोन गटांमध्ये बेदम मारहाण झाल्याचे घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील काँग्रेस भवन समोरील ठिकाणी घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की काँग्रेस भवनाच्या समोर कापड विक्रेते अशोक माळी हे त्यांच्या ग्राहकाला कापड दाखवीत असताना शेजारी असणाऱ्या अन्य दुसरा कापड विक्रेता सतीश भैरवानी यांनी ग्राहकाला आवाज देत स्वतःच्या गाडीवर बोलविले. यावरून अशोक माळी यांनी त्याला जाब विचारला असता वादाची ठिणगी पडली.

याचे रूपांतर हाणामारीत होऊन रस्त्यावर दगडफेक आणि लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आले असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम