
ग्राहक हिताचे आपले ध्येय सध्या करतांना महाबँक सॅलरी सेविंग योजनेत ४० लाखांचा ‘अपघाती विमा’
ग्राहकाच्या निधनानंतर संपूर्ण विम्याची रक्कम ही त्यांच्या परिवाराला सुपुर्द
ग्राहक हिताचे आपले ध्येय सध्या करतांना महाबँक सॅलरी सेविंग योजनेत ४० लाखांचा ‘अपघाती विमा’
ग्राहकाच्या निधनानंतर संपूर्ण विम्याची रक्कम ही त्यांच्या परिवाराला सुपुर्द
जळगाव प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताच्या अनेक योजना राबवत असते. याचाच फायदा हा शहाड्यातील बँकेच्या एका ग्राहकाला झाला आहे. शहादा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शासकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या गोकुळ दगा महाजन या ग्राहकाने ‘महाबँक सॅलरी सेविंग योजना’ अंतर्गत आपले पगार खाते बँक ऑफ महाराष्ट्र उघडले होते. बँकेच्या सर्व सुविधांचे ते लाभ घेत असताना त्यांना ‘महाबँक सॅलरी सेविंग योजना’ अंतर्गत बँकेकडून पगार खातेधारकांना ४० लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती मृत्यू विमा बँकेकडून मिळत असतो. याचा लाभ या ग्राहकाच्या परिवाराला त्यांच्या मृत्यूनंतर झाला आहे. शहाद्या बँकेच्या ग्राहकाच्या निधनानंतर संपूर्ण विम्याची रक्कम ही त्यांच्या परिवाराला सुपुर्द करण्यात आली. यावेळी DFS चे अवर सचिव श्री गोपी नाथ,बँक ऑफ महाराष्ट्र अंचल प्रबंधक प्रवीण कुमार सिंह, शाखा प्रबंधक तरुण हरडिया , व नियोजन अधिकारी अभिनव यांच्या हस्ते देण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र यहा बँकेने गेल्या एक वर्षात जळगाव, चोपडा, पारोळा, शहादा, हिसाळे येथे सुद्धा अशाच प्रकारे क्लेम सेटल केलेले आहेत
दिवंगत ग्राहकाच्या परिवाराने विम्याच्या मिळालेल्या रकमेमुळे त्यांचे घर वाचल्याची भावना व्यक्त करत बँकेचे आभार मानले आहेत. यासोबत इतर फायदे ज्यात अपघाती पूर्णतः अपंगत्व विमा ४० लाख रुपये, आंशिक अपंगत्व विमा २० लाख, विमान अपघात मृत्यू १ कोटी, गोल्डन अवर मेडिक्लेम १ लाख अशा विविध लाभ हे बँकेकडून विनामूल्य पगार खातेधारकांना प्रधान केले जाते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले पगार खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कुठल्याही जवळच्या शाखेत जावून काढून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम