ग. स . सोसायटीच्या भरती प्रकरणाची ६ जानेवारीला सुनावणी

बातमी शेअर करा...

ग. स . सोसायटीच्या भरती प्रकरणाची ६ जानेवारीला सुनावणी

जळगाव प्रतिनिधी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात गस सोसायटीतील नियमबाह्य भरतीप्रकरणी वाद चिघळला असून या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर दि. ६ जानेवारी रोजी नाशिक येथील सहनिबंधक कार्यालयात सुनावणी होणार आहे. सहकार न्यायालयासह सहनिबंधकांकडेही स्वतंत्र पिटीशन दाखल झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या भरतीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गस सोसायटीमध्ये लिपीक व शिपाई अशा एकूण ६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीसाठी तब्बल २६०० अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, लेखी परीक्षा न घेता केवळ तोंडी परीक्षेचा ‘फार्स’ राबवून मोजक्याच, कथित ‘वशिलेबाज’ उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचा आरोप होत आहे. निवडक उमेदवारांच्या तोंडी परीक्षा झाल्याचे दाखवून दि. २२ डिसेंबर रोजीच घाईघाईत त्यांना पदस्थापना देण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. या भरतीप्रकरणी चौकशीचा फास आवळला जात असतानाच न्यायालयीन लढाईही आता तीव्र होताना दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम