ग.स. सोसायटीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट

बातमी शेअर करा...

ग.स. सोसायटीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट

जळगाव | जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्या. (ग.स. सोसायटी) यांना दिनांक २९ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी सोसायटीचे कार्य व आर्थिक प्रगती याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभात संस्थेचे अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी मा.ना. पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सहकारमंत्र्यांनी संस्थेची माहिती जाणून घेतली व संचालक मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली.

या कार्यक्रमास मा. आमदार अनिलदादा पाटील, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजयजी पवार आणि व्हिओड बापू पाटील यांचा ही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ए. टी. पवार, संचालक उदय पाटील, अजयराव सोमवंशी, योगेश सनेर, सुनील सूर्यवंशी, महेश पाटील, मनोज माळी, भाईदास पाटील, योगेश इंगळे, अनिल गायकवाड, अजय देशमुख, विजय पवार, रागिणी चव्हाण, विजय पाटील, मनोजकुमार पाटील, व्यवस्थापक वाल्मीक पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम