
घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता
घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता
जळगाव | प्रतिनिधी– जळगाव शहरातील गोलानी मार्केट येथील हनुमान मंदिराजवळ २९ ऑगस्ट २०२० रोजी “घंटा नांद आंदोलन” झाल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात सर्व १० आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
भाजपचे कार्यकर्ते म्हणून आरोपींनी कोविड-१९ च्या निर्बंधाच्या काळात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी घंटा वाजवत निदर्शने केल्याचा आरोप होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दिली होती.
सदर प्रकरणात सुरेश भोळे(राजू मामा), गुरुमुग जगवाणि, ललित कोल्हे, अश्विन सोनवणे, दीपक सूर्यवंशी, भगत बालाणी, राजेश मराठे, कैलास सोनवणे, प्रदीप रोटे, सुनील माळी
या प्रकरणात आरोपींवर कलम २६९ भा.दं.वि. आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की:
आरोपी कोविड-१९ पॉझिटिव्ह होते याचा कोणताही पुरावा नसून,
कोणतीही स्वतंत्र साक्षीदार सादर केलेले नाहीत,
प्रतिबंधात्मक आदेशाची प्रमाणित प्रत सादर केलेली नाही आणि ती कायद्याप्रमाणे जाहीरही झालेली नाही,
तसेच घंटा किंवा फलक जप्त झाल्याचे पुरावे नाहीत.
या सर्व मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषमुक्त ठरवले. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ पोलीस साक्षी पुरेशी नाही, तर कायद्याच्या चौकटीत ठोस पुरावे आवश्यक आहेत.
अँड.आनंद मुजुमदार यांनी न्यायालयात स्पष्ट मांडणी करत दाखवून दिले की हे प्रकरण राजकीय हेतूंनी प्रेरित असून, आरोपींना चुकीच्या पद्धतीने गुंतवले गेले. त्यांच्या मजबूत युक्तिवादामुळे न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले की आरोपींविरुद्धचा खटला “संशयाच्या फायद्यावर” मोडीत काढण्यात येतो. सदर प्रकरणात अँड.अजय जोशी, अँड.महेश जोशी अँड कुणाल पवार अँड.अशोक महाजन, सतीश पाटील अँड. रोहन महाजन यांनी ही प्रभावी पणे न्यायालयीन कामकाज पाहिले व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम