
घटस्फोट न घेताच लावले लग्न !
वराडसीम येथील महिलेसह ८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा
घटस्फोट न घेताच लावले लग्न !
वराडसीम येथील महिलेसह ८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा
भुसावळ : घटस्फोट न घेताच दुसरे लग्न करून एका प्रौढाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळातील मूळ रहिवासी व सध्या बदलापूर येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय पुरुषाने विवाह केला असता, त्याला त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात घटस्फोट न झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी वराडसीम गावातील संबंधित महिलेसह तिच्या कुटुंबातील आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय आहे प्रकरण?
भुसावळातील सावरकर रोड, म्युनिसिपल पार्क येथील रहिवासी आणि सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असलेले प्रसाद उर्फ आशिष रमेश झोपे (वय ४७) यांचा कोरोना काळात वराडसीम येथील गौरी ढाके यांच्यासोबत विवाह झाला. लग्नावेळी त्यांना सांगण्यात आले की, गौरी ढाके यांचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. मात्र, काही काळानंतर हे खोटे असल्याचे उघडकीस आले. यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर प्रसाद झोपे यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गौरी उर्फ रत्ममाला मोरेश्वर ढाके, विजया मोरेश्वर ढाके, दीपक मोरेश्वर ढाके (सर्व वराडसीम), लीना सुनील काळे, अनिल अवधूत काळे (दोघेही – अयोध्या नगर, जळगाव), पुष्पक मोरेश्वर ढाके (माऊली नगर, जळगाव) आणि सोपान शालिक ढाके, ज्ञानदेव शालिक ढाके (जळगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश भानुदास पालवे करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम