घनश्याम महाजन यांची एन.एस.यु.आय.च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

बातमी शेअर करा...

घनश्याम महाजन यांची एन.एस.यु.आय.च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

रावेर (वार्ताहर) : सावदा येथील तरुण उद्योजक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते घनश्याम महाजन यांची भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एन.एस.यु.आय.)च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

राज्याध्यक्ष सागर साळुंखे आणि राज्य प्रभारी अक्षय यादव यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर, पक्षाच्या उच्च नेतृत्वाच्या सल्लामसलतीनंतर ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

घनश्याम महाजन हे रावेर तालुक्यातील तळागाळातील समर्पित आणि कार्यक्षम काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील शेतकरी तर आजोबा रेल्वे सेवेत कार्यरत होते. आईचे गाव खिरोदा असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबावर गांधीवादी आणि पुरोगामी विचारसरणीचा ठसा उमटलेला आहे. गावपातळीवर त्यांचा परिवार लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणूनही प्रसिद्ध आहे.

अलीकडच्या काळात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आंदोलन पुन्हा सक्रिय करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे गेल्या दशकभरापासून निष्क्रिय असलेली एन.एस.यु.आय. संघटना नवचैतन्याने जिल्ह्यात कार्यरत झाली असून, विद्यार्थ्यांमध्ये संघटनेबद्दल नव्या विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम