
घरकुल लाभार्थ्यांना मिळालेले अनुदान म्हणजे शासनाकडून केलेली थट्टा !
शासनाने घरकुलसाठी मिळणारी रक्कम वाढवून देण्याची मागणी
घरकुल लाभार्थ्यांना मिळालेले नमूद म्हणजे शासनाकडून केलेली थट्टा !
शासनाने घरकुलसाठी मिळणारी रक्कम वाढवून देण्याची मागणी
कजगाव प्रतिनिधी
घरकुल लाभार्थ्यांना घरासाठी फक्त एक लाख वीस हजार ते एकलाख चाळीस हजार रुपये मिळणारे अनुदान म्हणजे शासनाने लाभार्थ्यांची थट्टा केली असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ट्टप्पा २ ह्या ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कजगाव ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले होते ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी घरकुल संदर्भातील प्रश्न मांडला आहे तसेच ह्या बाबतीत सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन यांनी नागरिकांच्या भावना शासन दरबारी पोहच करावी तसेच शासनाने एक लाख वीस हजार रुपयात घर बांधून दाखवावे असे आव्हान कजगाव येथील नागरिक एकनाथ तुकाराम महाजन यांनी दिले व शासनाने घरकुल साठी मिळणारी रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी ही महाजन यांनी केली आहे
कजगाव येथील अनेक घरकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे मात्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान हे अत्यंत कमी असून त्या तटपूंजी रकमेत घर बांधणे अत्यंत अवघड झाल्याचे घरकुल लाभार्थ्यांचे म्हणणें आहे तसेच घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य व मजुरी यांचें भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे ही रक्कम अत्यंत कमी असून शासनाने गरीब व गरजू लाभार्थ्यांची थट्टा केल्याचा सुर गावात व्यक्त होत आहे जी रक्कम शासन घर बांधण्यासाठी अनुदान रुपी देते त्यात घर बांधणे अवघड झाले आहे शासनाकडून मिळणाऱ्या रकमेत घर बांधण्यासाठी येणारी अडचण पाहता काही लाभार्थी व्याजाचे पैसे काढून आपले घर बांधत असल्याचे अनेकांचे म्हणणें आहे त्यामुळें शासनाने घरकुल अनुदानात वाढ करावी अशी मागणी होत आहे
घरकुल योजनेतील लाभर्थ्यांना मिळणारी रक्कम ही अत्यंत कमी आहे त्यात घर बांधणे शक्य होत नाही परिणामी घराचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक लाभार्थी व्याजाचे पैसे काढून घरकुल पूर्ण करीत असतात त्यामुळे ह्या रकमेत शासनाने तत्काळ वाढ करावी
एकनाथ महाजन ग्रामस्थ
घरकुलासाठी मिळणारी रक्कम ही अत्यंत कमी असल्याने नागरिकांना घर बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते सामान्य नागरिकांना मिळणारे घरकुल आता फार अवघड झाले आहे मिळणारी रक्कम कमी व खर्च अधिक असल्याने लाभार्थ्यांचे आर्थिक गणित अवघड झाले आहे त्यामुळे लवकरच घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रकमेत शासनाने वाढ करावी
मांगीलाल मोरे ग्रामपंचायत सदस्य कजगाव

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम